Wednesday, 7 October 2020

माजी सैनिक मुलींचे वसतीगृहात चौकीदार पदासाठी भरती

             जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) - जळगाव जिल्ह्यातील माजी सैनिकी मुलींचे वसतिगृहामध्ये कंत्राटी चौकीदार पदासाठी आवेदन मागविण्यात येत आहे. हे पद 24 तास कामकाजाचे असून यासाठी दरमहा 8911/-    (अक्षरी रु. आठ हजार नऊशे अकरा मात्र) इतके मानधन देण्यात येईल.

            तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना आवाहन करण्यात येते की, सदर पदासाठी इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांचेकडे दिनांक 10 ऑक्टोबर, 2020 पर्यंत आवेदन सादर करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

No comments:

Post a Comment