Thursday, 5 November 2020

जिल्ह्यातील सिनेमा हॉल्स 50 टक्के बैठक व्यवस्था क्षमतेसह सुरु करण्यास परवानगी

         जळगाव, (जिमाका) दि. 5- जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले क्षेत्र वगळून व भविष्यात वेळोवेळी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणारे क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रात स्विमींग पुल हे राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सराव करण्यासाठी आजपासून (5 नोव्हेंबर) सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि, याबाबतची स्वतंत्र नियमावली (SOP) क्रिडा व युथ अफेअर्स विभागाकडून स्वतंत्र्यरित्या निर्गमित करण्‍यात येईल,

योगा इन्स्टीट्युटस सुरु करण्यात येत आहे तथापि, याबाबतची स्वतंत्र नियमावली (SOP) सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल.

  सर्व इनडोअर खेळ उदा. बॅडमिंटन, टेनीस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेंज इत्यादी खेळ हे शारीरीक अंतर ठेवून व स्वच्छतेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करुन सुरु करण्यात येत आहे.

 सिनेमा हॉल्स/थिएटर्स/मल्टिप्लेक्स/ड्रामा थिएटर्स इत्यादी 50 टक्के बैठक व्यवस्थेच्या क्षमतेसह सुरु राहतील. तथापि, खाण्यायोग्य आहार इत्यादीचा वापर सिनेमा हॉल्स थिएटर्र/मल्टिप्लेक्स/ड्रामा थिएटर्स च्या ठिकाणी करता येणार नाही. तसेच याबाबतची स्वतंत्र नियमावली (SOP) सांस्कृतिक कार्यक्रम विभागाकडून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल.

 कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPs) नुसार वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश यापुढेही लागू राहतील.

 या आदेशाचे उल्लघन केल्यास सदरची बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षस पात्र राहील. असे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.

०००

No comments:

Post a Comment