जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 5 - राज्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा शुक्रवार दि. 6 नोव्हेंबर, 2020 रोजीचा सुधारित दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि. 5 नोव्हेंबर, 2020 रोजी सायं 6 वा. नंदुरबार येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार दिनांक 6 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11 वा.30 ते 12.30 मि.नी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे प्रकल्प अधिकारी व संबधित यंत्रणा यांच्यासमवेत जिल्ह्यातील आदिवासी उपाययोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेर राबविण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा बैठक. दुपारी 1.00 ते 2.00 वा. कॉग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांच्या भेटी, दुपारी 2.00 ते 3.00 वा. अजिंठा, शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे राखीव. दुपारी 3 वा 15 नी जळगाव येथून डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज जळगाव खुर्द कडे रवाना, दुपारी 3 वा 15 ते 3 वा 30 मि.नी डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज जळगाव खुर्द येथे भेट. दुपारी 3 वा 30 ते 5 वाजता जळगाव खुर्द येथून रावेरकडे प्रयाण. सायं 5.00 ते 5 वा 30 मि नि. रावेर येथील पीडित कुटुंबाला व घटनास्थाळाला भेट. सायं 5 वा. 30 मि. नी रावेर येथून लोहाराकडे प्रयाण, सायं 5 वा 45 मि. नी ते 6 वा. लोहारा येथील आदिवासी आश्रम शाळेला भेट. सायं. 6.00 ते 7.00 वा. लोहारा येथून मुक्ताईनगरकडे प्रयाण. रात्री 7 ते 8 वा. मुक्ताईनगर येथे राखीव. रात्री 8 वा. मुक्ताईनगर येथून नंदुरबारकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment