Friday, 20 November 2020

जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

        जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 20 - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि दर्जी फाऊंडेशन, जळगांव यांचे संयुक्‍त विद्यमाने जिल्‍ह्यातील युवक आणि युवतींसाठी दिनांक 24 नोव्हेंबर, 2020 रोजी युवक व युवतींना शासकीय आणि अशासकीय क्षेत्रातील रोजगाराच्‍या सुवर्णसंधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे दुपारी 4.00 ते 5.00 या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे.

            या मार्गदर्शन सत्रास प्रा. श्री. गोपाल दर्जी, दर्जी फाऊंडेशन, जळगांव हे युवक व युवतींना शासकीय आणि अशासकीय क्षेत्रातील रोजगाराच्‍या सुवर्णसंधी व इतर अनुषंगिक बाबींविषयी  मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राच्‍या थेट प्रसारणाचा लाभ घेण्‍यासाठी खालील यूटयूब चॅनेल/फेसबुक पेज  / यूट्यूब लिंक चा वापर करावा.      यूट्यूब चॅनेल -          gopal darji sir jalgaon

            यूट्यूब   लिंक -          https://www.youtube.com/c/GopalDarji

            फेसबुक पेज  -         www.facebook.com/jalgaonskill

          तसेच या ऑनलाईन सत्राच्‍या शेवटी आपले प्रश्‍न शंका यूट्यूब चॅनेलवरील कॉमेंट बॉक्‍समध्‍ये विचारण्‍यात यावेत.

            जळगाव जिल्‍ह्यातील जास्‍तीत जास्‍त उमेदवारांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

No comments:

Post a Comment