डाक विभागात जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल
जीवन विमा पॉलीसी एजंटसाठी थेट भरती
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.6:- भारतीय डाक विभाग जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी पॉलीसी एजंटसाठी थेट भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता किमान 10 व 12 उत्तीर्ण असणे आवश्यक असून उमेदवार 18 ते 60 वयोमर्यादेतील असावा. उमेदवारांची निवड ही मुलाखत पद्धतीने होणार असून त्यासाठी दिनांक 24 नोव्हेंबर, 2020 डाक अधीक्षक जळगाव यांचे कार्यालय जळगाव या पत्यावर रजिष्टर पोष्टाने अर्ज पाठवावेत अर्जाचा नमुना हा डाक अधीक्षक कार्यालय येथे उपलब्ध असून इच्छूकांनी अर्जाचा नमुना प्राप्तकरण्यासाठी डाक अधिक्षक कार्यालय, पांडे चौक, हेड पोस्ट ऑफिसच्यावर येथे संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधिक्षक जळगाव विभाग जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment