जळगाव, (जिमाका) दि. 18:- महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे –
गुरुवार दि. 19 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सकाळी 11.30 वा. जागतिक स्वच्छता दिन कार्यक्रमात उपस्थिती (स्थळ- जिल्हा परिषद, जळगाव), दुपारी 12.00 वा. रामदेववाडी ता. जळगाव येथील शिवसेना शाखा कार्यालयास सदिच्छा भेट. सोईनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 3.00 वा. पाळधी ता. धरणगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालय जळगावाकडे प्रयाण. दुपारी 3.20 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थिती (व्ही.सी.द्वारा) (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), बैठक संपल्यानंतर पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
00000
No comments:
Post a Comment