Wednesday, 4 November 2020

नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

 
 

            जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 4 - कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात 30 नोव्हेबर, 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.

            विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे या महिन्याचा दुसरा सोमवार, दिनांक 9 नोव्हेंबर, 2020 या दिवशी होणारा लोकशाही दिनाचा कार्यक्रम वरील कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. असे राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी कळविले आहे.

00000            

No comments:

Post a Comment