जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 - देशाच्या माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मता शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते श्रीमती गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसिलदार पंकज लोखंडे, तहसिलदार मुकेश हिवाळे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Thursday, 19 November 2020
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment