तंबाखू नियंत्रण व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम समन्वय समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचेसह विविध जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये तंबाखू किंवा तत्संबंधी पदार्थांच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचा व्यापक प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना आरोग्य, शिक्षण तसेच सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच 12 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रामुख्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती, शाळा महाविद्यालय परिसराच्या 100 मीटरपर्यंत अशा कुठल्याही वस्तु विकल्या जाणार नाही याची खबरदारी घेणेबाबतत सूचना केल्यात. त्याचबरोबर तंबाखूचे सेवन करणाऱ्या नागरीकांचे समुपदेशन करावे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी तंबाखू नियंत्रण समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात तंबाखू नियंत्रणाच्या कामाचा सविस्तर आढावा सादर केला तर डॉ भारती यांनी समितीच्यामार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी सांगितलेकी, जिल्ह्यातील 3298 शाळांपैकी आतापर्यंत 2500 शाळांनी ॲपवर नोंदणी केली आहे. त्यापैकी 1243 शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. समितीमार्फत करण्यात येत असलेल्या समुपदेशन कार्यक्रमात आतापर्यत तंबाखूचे सेवन करणाऱ्या जिल्ह्यातील 1563 नागरीकांनी सहभाग घेतला आहे. यापैकी 263 नागरीकांनी तंबाखू खाणे बंद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणाऱ्या 290 व्यक्तींकडून 8840 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी बैठकीत दिली. बैठकीस उपस्थितांनी उपयुक्त सुचनाही मांडल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तंबाखूमुक्त अभियानाच्या प्रचार साहित्याचे अनावरण करण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment