Friday, 19 February 2021

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन


            जळगाव, (जिमाका) दि. 20 - आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

        याप्रसंगी तहसिलदार (महसुल) पंकज लोखंडे, अव्वल कारकुन देवेद्र कोळी, आर. एस. पाटील यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००


 

No comments:

Post a Comment