जळगाव, दिनांक 12 जुलै (जिमाका वृत्तसेवा) : टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत राही सरनोबत (पिस्तुल शुटींग), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), प्रविण जाधव (आर्चरी रिकर्व्ह ) विष्णु सरवानन (सेलींग), स्वरुप उन्हाळकर (पॅराशुटींग), सुयश जाधव (पॅरास्विमीग), तेजस्विनी सावंत (रायफल शुटींग), उदयन माने (गोल्फ), अविनाश साबळे (ॲथलेटीक्स), भाग्यश्री जाधव (पॅरा ॲथलेटीक्स) हे महाराष्ट्राचे 10 खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरिता व जिल्ह्यात खेळाचे वातावरण निर्माण व्हावे, याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय, जळगाव मार्फत खेळाडूंच्या मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे खेळाडूंच्या मशाल रॅलीचे उद्घाटन डाॅ. प्रवीण मुंढे, जिल्हा पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या हस्ते सेल्फी पॉईन्ट व खेळाडूंचे स्टॅडीबॅनर यांचे फीत कापुन उद्घाटन करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमानंतर मिलिंद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी उपस्थित खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्टृाच्या 10 खेळाडूविषयी माहिती सांगितली व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी डाॅ. प्रवीण मुंडे, जिल्हा पोलीस अधिक्षक, जळगाव यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. ऑलिम्पिक स्पर्धेत यापेक्षा जास्त संख्येने खेळाडू सहभागी होतील व त्यात आपल्या जळगावच्या खेळाडूंचाही समावेश असेल अश्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मशाल प्रज्वलीत करुन खेळाडुंच्या मशाल रॅलीस हिरवा झेंडा दाखवुन रॅलीस सुरुवात करण्यात आली. रॅलीस श्री.छत्रपती शिवाजी महाराज, जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रॅली कोर्ट परिसर-नवीन बसस्थानक- -आकाशवाणीचौक-भाऊचे उद्यान, तिथून परत आकाशवाणीचौक व त्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे समाप्त करण्यात आली.
या रॅलीत निलेश बॉक्सीग क्लबचे दिशा पाटील, संध्या मोरे, देवांश चांगळे हे राष्ट्रीय खेळाडू व इतर राज्यस्तर खेळाडू, पोलीस जलतरण तलावाचे खेळाडू, हॉकी व खो-खो प्रशिक्षण केंद्रावरील खेळाडु, बास्केटबॉल संघटनेचे खेळाडु या रॅलीत सहभागी झाले होते.
या रॅलीत मिंलिंद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव, क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, श्रीम.रेखा पाटील, श्रीम.सुजाता गुल्हाणे, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, मिनल थेारात, राजेद्र चव्हाण, रणजित पाटील, कमलेश नगरकर, निलेश बॉक्सीग क्लबचे प्रशिक्षक निलेश बावीस्कर, नयन राणे, गोविंद सोनवणे, संजय मेहेरे, विनोद कुलकर्णी, विनोद माने, सुरज पवार इ. सर्वानी खेळाडूंच्या मशाल रॅलीत सहभाग घेऊन ऑलम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व जिल्हयात खेळाविषयी वातवरण निर्मिती करण्यात आली.
000000
Tuesday, 13 July 2021
ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहनासाठी जळगावात मशाल रॅली संपन्न
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment