जळगाव, दि.17 (जिमाका वृत्तसेवा) – “समान संधी केंद्रे” यासाठी जळगाव जिल्हयातील महाविद्यालय स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकारी यांची दि. 14 फेब्रुवारी, 2022 रोजी एम. जे. महाविदयालय, जळगाव येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांचे अध्यक्षतेखाली मार्गदर्शन देण्याकरिता बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीसाठी जिल्हयातील विविध महाविद्यालयातील समन्वय अधिकारी उपस्थित होते.
या
समान संधी केंद्र याबाबत राज्यातील विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय
मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
सोबतच उद्योजकता व्य्वसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करणे,
तसेच संवाद अभियान – युवा संवाद यासारखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता आता महाविद्यालयामध्येच
विद्यार्थ्यांसाठी समान संधी केंद्रे ( Equal Opportunity Centre ) स्थापन करण्याचे
समाज कल्याण विभागाने ठरविले आहे. त्यासंदर्भात मा. मंत्री सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभाग यांनी नुकतेच निर्देशीत केले आहे.
जिल्हयातील
प्रत्येक महाविदयालयात त्या महाविदयालयातील किमान एक प्राध्यापक दर्जाचे समन्वय अधिकारी
व सहाय्यक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच समान संधी
केंद्रे सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र
शासन पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित विकासासह त्याचे
सर्व मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास
व व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने या केंद्राच्या माध्यमातून
उपायोजना करण्याचे ठरवले आहे. सदर “ समान संधी केंद्राच्या ” माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षाणासाठी प्रोत्साहित करणे, रोजगार
प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता व व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व
बाबींचा सर्वसमावेशक मार्गदर्शन याव्दारे
करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील
सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय तसेच इतर सर्व शैक्षणिक
संस्था व त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये या स्वरुपाची
केंद्रे तात्काळ 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालय चालू नसेल तरी प्रत्येक महाविद्यालयाने सदर “ समान संधी केंद्राची ” स्थापना करुन महाविद्यालय निहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करुन त्यासाठी जिल्हा
स्तरावर समन्वय अधिकारी यांचा व्हाटसअप ग्रुप तयार करण्यात येणार असून याव्दारे
संबंधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय् विद्यार्थ्यांशी समन्व्य करण्यात येईल,
असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश
पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment