Wednesday, 16 February 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

           जळगाव, दि.१६ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील गुरुवार १७ फेब्रुवारी, २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

            पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : गुरुवार १७ फेब्रुवारी,२०२२ रोजी सकाळी ६.३८ वाजता मुंबई येथून महानगरी एक्सप्रेसने जळगाव येथे आगमन, सकाळी ६.४५ वाजता जळगाव रेल्वेस्थानक येथून पाळधी ता. धरणगाव कडे शासकीय वाहनाने प्रयाण, सकाळी ७.०५ वाजता पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव, सकाळी ९.३० वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी व नियोजित कार्यक्रमाना उपस्थिती, सोईनसार पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव, दुपारी ४.०० वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी व नियोजित कार्यक्रमाना उपस्थिती, सोईनुसार पाळधी ता. धरणगाव कडे  प्रयाण व राखीव.

०००००

No comments:

Post a Comment