Friday, 25 November 2022

मंडणगड पॅटर्न, अंतर्गत जळगाव जिल्हयातील महाविदयालयांना भेटी

        जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : -मंडणगड पॅटर्न अंतर्गत जळगाव जिल्हयातील महाविदयालयांना भेटी देवून विदयार्थी तसेच महाविदयालयांचे प्राचार्य / कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्याकरीता मा. उपायुक्त, समाज कल्याण व मा. महासंचालक, बार्टी पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 25 नोव्हेंबर, 2022 रोजी जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी श्री. बी.यु.खरे यांनी अमळनेर तालुक्यातील  श्री. एन.टी. मुंदडा कनिष्ठ महाविदयालय अंमळनेर येथे विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यशाळेस जळगाव समितीचे नवल चव्हाण, महाविदयालयाचे प्राचार्य तसेच कर्मचारी वृद तसेच 80 विदयार्थी उपस्थित होते.

            तसेच सदर कार्यशाळेच्या अनुषंगाने पारोळा तालुक्यातील श्री. किसान कनिष्ठ महाविदयालय पारोळा येथे जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी श्री. बी. यु.खरे, यांनी विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यशाळेस जळगाव समितीचे नवल चव्हाण, महाविदयालयाचे प्राचार्य तसेच कर्मचारी वृंद तसेच 105 विदयार्थी उपस्थित होते. तसेच किसान कनिष्ठ महाविदयालय पारोळा यांचे सन 2022-23 यावर्षात वर्ग 11 वी 309, वर्ग 12 वी 310, या अर्जापैकी 177 विदयार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन प्रस्ताव  समितीकडे प्राप्त झाले आहेत.

            तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव अंतर्गत दिनांक 22 नोव्हेंबर, 2022 तसेच दिनांक 23 नोव्हेंबर, 2022 रोजी कार्यालयस्तरावर विदयार्थ्यांच्या अर्जाकरीता त्रुटी पुर्तता मोहिम आयोजित करण्यात आली असून सदर त्रुटी पुर्तते मोहिमेत 39 विदयार्थ्याच्या अर्जांची त्रुटी पुर्तता करण्यात आली आहे. असे सदस्य सचिव  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बी.यु. खरे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment