Wednesday, 23 November 2022

पदवीधर मतदार म्हणून नाव नोंदणी करणे बाबत आवाहन

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 23  1 नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची प्रारूप मतदार यादी दिनांक 23 नोव्हेंबर, 2022 रोजी पदनिर्देशित ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रारूप यादीनुसार आतापर्यंत जिल्हयात एकूण 24211 पदवीधर मतदार नोंदणी झालेली आहे. या प्रारूप मतदार यादीची प्रत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देखील देण्यात येत असून यापूर्वी नमूना 18 भरून ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी केलेल्या पदवीधर नागरिकांनी आपले नाव प्रारूप मतदार यादीत असलेबाबत खात्री करुन घ्यावी.

          पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्ज करुनही ज्यांची नावे काही कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होवू शकली नाहीत किंवा ज्यांची नाव नोंदणी अद्याप बाकी आहे त्यांना दिनांक 23 नोव्हेंबर,2022 ते 9 डिसेंबर,2022  या कालावधीत नमूना 18 भरून नाव नोंदणी करता येईल. याशिवाय प्रारूप यादीतील नोंदीवर ज्यांना दावे किंवा हरकती दाखल करावयाच्या असतील त्यांनी लागू असेल असा नमुना 18, नमुना 7 किंवा नमुना 8 भरुन वरील कालावधीत दाखल करता येतील.

 तरी पात्र पदवीधर नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा,  व पदवीधर मतदार म्हणून नाव नोंदणी

करून घ्यावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव यांचेवतीने करण्यात येत आहे. असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी, तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment