जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे दिनांक 6 डिसेंबर, हा दिवस भारतीयांसाठी दुखाचा, गांभिर्याने पालन करावयाचा दिवस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषर्यी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने दिनांक 26 नोव्हेंबर, 2022 संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर, 2022 पर्यंत समता पर्व आयोजित केले आहे.
त्याअनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळणी समिती जळगाव मार्फत दिनांक 26 नोव्हेंबर, 2022 रोजी संविधान दिनाच्या
औचित्य साधून मागासवर्गीय विदयार्थ्यांचे 450 प्रकरणे वैध करुन मागासवर्गीय विदयार्थ्यांना
ऑनलाईन निर्गमित ( वाटप) करण्यात आलेली आहेत. असे सदस्य सचिव जिल्हा जात पडताळणी
समिती जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment