जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) : आद्य मराठी पत्रकार ‘दपर्ण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) शुभांगी भारदे,
तहसिलदार (सामान्य शाखा) सुरेश थोरात, तहसिलदार (संगायो) जितेंद्र कुंवर, नायब
तहसीलदार अमित भोईटे यांचेसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment