Monday, 19 June 2023

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अंमळनेर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

             जळगाव, दि.१९ (जिमाका वृत्तसेवा) : - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित          मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अमळनेर –सिंधी कॉलनी जवळ चोपडा अमळनेर येथे असून सदर वसतिगृहात सन २०२३-२४  या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.  

 सदर प्रवेशासाठी अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. परिपूर्ण भरलेला अर्ज वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पहावयास मिळतील. वसतिगृह  प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल.

          तरी वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर सुविधा दिल्या जातील, असे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तिगृह अमळनेर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment