जळगाव, दि. 25 (जिमाका)- महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट गतिमान प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण तसेच ग्रामिण भागातील नागरिकांचे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावणे असा आहे.
या अनुषंगाने, जळगाव तालुक्यातील
मौजे कानळदा (महर्षी कन्व आश्रम) येथे दिनांक २६ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता
शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,
शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांचे
तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे.
शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत
आहे की, ते या शिबीरात सहभागी व्हावे व आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांचे
निवारण करून घ्यावे. अधिक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रशासनाने केले आहे.
००००००००००
No comments:
Post a Comment