जिमाका जळगाव, दि.12 : - जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी (१०० खाटांचे स्त्री रुग्णालय) येथे दाखल एका महिला रुग्णाला दीर्घकाळ पोटदुखी व अतिरक्तस्रावाचा त्रास होत होता. तपासणीत गर्भपिशवीत चार मोठ्या गाठी असल्याचे निदान झाले.
गाठींचा आकार मोठा असल्याने दुर्बिणीद्वारे
(लेप्रोस्कोपिक) शस्त्रक्रिया करणे अत्यंत कठीण होते. तरीसुद्धा, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. चंदन गोपाळ महाजन यांनी यशस्वी दुर्बिणीद्वारे
शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे तसेच भूलतज्ञ
डॉ. सुनील तायडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी (जळगाव) येथे गर्भपिशवीवरील
अशा प्रकारच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत करण्यात येतात. जिल्ह्यातील
सर्व गरजू रुग्णांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम
सोनवणे यांनी केले आहे.
०००००००००००००
No comments:
Post a Comment