Wednesday, 6 August 2025

जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित

         जळगाव, दि. 6 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक अयोध्यानगर जळगाव येथील असून सर्व तीनही  भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.

परंतू  मा.  जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार उत्तरकाशी येथील Maount Bhagirathi Home Stay Harshil

            या स्टे हाऊस शी जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क केला असता सदर  मेहरा कुटुंबातील अनामिका मेहरा .आरोही मेहरा,रुपेश मेहरा –  हे उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक  अयोध्या नगर जळगाव येथील असून सर्व तीनही  भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.

     सदर भाविकांचे वडील श्री चंद्रशेखर नरवरिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कशात आले असता त्यांचा उपरोक्त स्टे हाऊस मालकाशी संपर्क करून दिला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जळगाव

००००००००००

No comments:

Post a Comment