जळगाव, दि.5:- महाराष्ट्र
आपत्ती धोका व्यवस्थापन कार्यक्रमां अंतर्गत आयोजित पाणबुडे (स्कुबा डायविंग) दोन
दिवशीय कार्यशाळेचे उदघाटन आज सकाळी जिल्हाधिकारी श्री.किशोरराजे निंबाळकर यांच्या
हस्ते मु.जे. महाविद्यालयाचा एकलव्य क्रीडा संकुलाच्या तरणतलावात झाले. यावेळी मुंबई येथील तज्ञ प्रशिक्षक सर्जन
डॉ. विश्वास कापटनेकर, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी हे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले 13 ऑक्टोबर हा आपत्ती निवारण दिन साजरा करण्यात येणार असून
यानिमित्ताने जिल्हयात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती
लोकसहभाग अभियान अंतर्गत नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, भूकंप, महापूर
इत्यादी आपत्ती बाबत तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवका, पोलीस पाटील, शालेय
महाविद्यालयीन विद्यार्थी एन. सी.सी. एन एस.एस, होमगार्ड यांना प्रशिक्षण दिले
जाणार आहे. सहभागी प्रशिक्षणार्थानी आपल्याला मिळणारे ज्ञान भविष्यात लोकांचे
प्राण वाचविण्यास सहाय्यभूत ठरणार असून सामाजिक भावनेतुन ते आत्मसात करावे असे
आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी एन पी. रावळ यांनी कार्यशाळा आयोजनाबाबत माहिती देतांना सागितले की स्कूबा
डायविंगसाठी तीन संच खरेदी करण्यात आले आहेत. या कार्यशाळेत 15 प्रशिक्षणार्थी
सहभागी झाले असून यात प्रामुख्याने जळगाव महानगर पालिका, जैन इरिगेशन, वन्यजीव
संरक्षण दल भुसावळ, अर्जूना बहु उद्देशिय संस्था भुसावळ यांचा सामावेश असल्याचे सांगून
उपस्थितांचे त्यांनी आभार मानले.
०००००
No comments:
Post a Comment