Wednesday, 5 February 2020

मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रामार्फत शिकाऊ उमेदवारांची परिक्षा 20 मार्चपासून परिक्षा फॉर्म 6 फेब्रुवारीपासून भरता येणार


            जळगाव, दि. 5 (जिमाका) :- शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 20 ते 22 मार्च, 2020 दरम्यान ऑफलाईन पध्दतीने होणार आहे. तसेच 6 ते 20 फेब्रुवारी, 2020 या दरम्यान apprenticeship.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांनी परिक्षा फॉर्म ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे असून परिक्षा फी सुध्दा ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाची आहे.
            तरी संबंधित सर्व परिक्षार्थींनी याची नोंद घ्यावी, असे अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment