जळगाव, दि. 6 (जिमाका) - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शुक्रवार, दिनांक 7 फेब्रुवारी, 2020 रोजी
जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शुक्रवार, दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.15 वाजता
अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्टेशन येथे आगमन. सकाळी 6.30 वाजता जळगाव रेल्वे
स्टेशन येथून शासकीय वाहनाने पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 7.00 वाजता पाळधी,
ता. धरणगावकडे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना
भेटी. दुपारी 2.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4.00 वाजता
धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सांयकाळी 7.00 वाजता महाविकास
आघाडीतर्फे साने पटांगण, ता. धरणगाव येथे
आयोजित भव्य नागरी सत्कारास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व
राखीव.
0000
No comments:
Post a Comment