Saturday, 15 February 2020

कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन






            जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :- जैन इरिगेशन सिस्टिम्स, जैन हिल्स येथील कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार, कामगार व राज्य उत्पादन शुलकमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, चिमणराव पाटील, अनिल पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी आदी उपस्थित होते.
            यावेळी श्री. ठाकरे यांनी उपस्थितांसमवेत विकास केंद्रातील प्रयोगशाळांची पाहणी केली. जैन इरिगेशनचे अनिल जैन आणि अशोक जैन यांनी केंद्राच्या प्रमुख प्रयोगशाळांबद्दल माहिती दिली.
            यावेळी भविष्यात होणारी शेती कशी असेल याबाबत व्हर्टिकल फार्मिंग, टिश्यू कल्चर, हायड्रोपोनिक्स, न्यूट्रिकेयर अँड फिल्टरेशन, ऑटोमेशन, ऍरोपोनिक पोटॅटो, पोटॅटो ब्रीडिंग, सोलर पंप आदी विषयांच्या प्रयोगशाळांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी भेट देऊन माहिती घेतली.
0000

No comments:

Post a Comment