Friday, 7 February 2020

लेखा व कोषागारे विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे 8 व 9 फेब्रुवारी रोजी जळगावात आयोजन


जळगाव, दि. 6 (जिमाका) - लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती यांच्यावतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक 8 व 9 फेब्रुवारी, 2020 रोजी दोन दिवसीय नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे हस्ते शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगावचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब घोरपडे हे राहणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद, नाशिकचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे महाव्यवस्थापक उत्तम कावडे, वरिष्ठ कोषागार अधिकारी, नाशिक विलास गांगुर्डे, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव मिलींद दीक्षीत, महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागारे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बालाजी परदेशी, संघटनेचे विभागीय अध्यक्ष योगेश सोनवणे, राजपत्रित संधटनचे विभागीय अध्यक्ष रमेश शिसव, सरचिटणीस राजेश राजवाडे, सचिव लक्ष्मण नेवाडकर, सहसचिव अन्नासाहेब भडांगे हे लाभणार आहेत.
या स्पर्धाचे आयोजक म्हणून सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक. निलेश राजुरकर, सहसंचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, नाशिक विभाग, नाशिक गिरीष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, विनोद गायकवाड, महानगर पालिकेचे मुख्य लेखापरिक्षक संतोष वाहुळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडीत, सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, जळगाव विनोद चावरे हे आहेत.
या क्रीडा स्पर्धेला विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच  नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून स्पर्धेतील खेडाळूडूंचे मनोबल वाढवावे. असे आवाहन निमंत्रक कोषागार कर्मचारी विभागीय अध्यक्ष गोविंद पाटील, सचिव रवी चौधरी, सहाय्यक लेखा अधिकारी संघटना, जळगाव प्रविण पाठक, लेखा व कोषागारे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष घन:श्याम चौधरी, स्थानिक निधी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील व जिल्ह्यातील वित्त व लेखा विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                0000

No comments:

Post a Comment