Monday, 20 July 2020

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास 6 ऑगस्टपर्यत मुदतवाढ


        जळगाव, दि. 20 (जिमाका) - केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता महाराष्ट राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता 13 व बेंकटगिरी करीता 2 जागाच्या  प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि 17 जुलै, 2020 पर्यंत मागविण्यात आले होते.
            तथापि, आय.आय. एच. टी, बरगढ यांचे दि. 15 जुलै 2020 अन्वये असे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने याबाबतचे अर्ज दि. 6 ऑगस्ट, 2020 पर्यंत मागविण्यात येत आहे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योगआयुक्तालयाचे वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in  वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे डॉ. माधवी खोडे-चवरे, आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment