Thursday, 2 July 2020

जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द


        जळगाव, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) :  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत संपूर्ण देशभरात दि. 31 जुलै, 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे.
        त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माहे जुलै 2020 मधील पहिल्या सोमवारी होणारा 6 जुलै, 2020 चा नियोजित जिल्हा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
                                                                      00000

No comments:

Post a Comment