जळगाव,
दि. 7 (जिमाका) - कृषि विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी, मुक्ताईनगर व जिल्हा
गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांनी संयुक्त तपासणीत युरीया खताची निर्धारीत
दरापेक्षा जादा दराने विक्री, तसेच खत व किटकनाशक कंपनीचे उगम प्रमाणपत्र
परवान्यात समाविष्ठ न करता खरेदी, साठवणुक व विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने
मे. सागर सिडस, मुक्ताईनगर, जि. जळगाव या कृषि केंद्राचा खत परवना 2 जुलै 2020
पासुन 3 महिने व किटकनाशक परवाना 1 महिन्यासाठी कृषि विभागामार्फत निलंबित करण्यात
आला आहे.
शेतकरी
बांधवांनी खते खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे व बिलामध्ये कंपनीचे नाव, पत्ता,
रक्कम व इतर बाबींचे रकाने भरलेले असल्याची खात्री करुनच खते खरेदी करावे. असे
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
0000
No comments:
Post a Comment