Tuesday, 24 August 2021

मुंबई येथे डाक अदालतीचे आयोजन 10 सप्टेंबरपर्यंत तक्रारी पाठविण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 24 - पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींच्या निराकरणासाठी चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी. पी. ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई येथे दि. 29 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी अकरा वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

            या डाक अदालतमध्ये टपाल वस्तु, मनीऑर्डर, बचत बँक खाते प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबची तक्रार दोन प्रतीत श्री. एम, शान्तला भट्ट, सहाय्यक निदेशक (ज.शि) तथा सचिव डाक अदालत, चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी.पी.ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे 10 सप्टेंबर, 2021 पर्यंत पाठवावे. असे आवाहन अधिक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग, जळगाव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment