Wednesday, 19 January 2022

सधन कुक्कुट विकास गटासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

           जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) :-जळगाव जिल्ह्यात जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ, जळगाव तालुक्यातून खासगी भागिदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करावयाची आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात एका पात्र लाभार्थीची निवड ही जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती -  जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ जळगाव, अमळनेर यांच्यामार्फत प्रस्ताव आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह  या कार्यालयास 31 जानेवारी 2022 पर्यत सादर करावा. अधिक माहिती व अर्जाचा विहित नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ  जळगाव, अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

No comments:

Post a Comment