Monday, 17 January 2022

राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्त ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन

                 जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : - मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी 2022 रोजी बारावा राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हा व मतदान केंद्र स्तरावर कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करुन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी पूर्ण निवडणुका हा विषय  (Theme)  देण्यात आलेला आहे. यावर्षी जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे ऑनलाईन साजरा करण्यात येणार आहे.

                राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून शालेय ( 9 वी ते 12 वी ) तसेच महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी 15 ते 20 जानेवारी, 2022 पर्यंत निबंध, चित्रकला, मीम/पोस्टर, घोषवाक्य, रांगोळी व काव्य स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांचे नियमावली  http://nvdj.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून सदर संकेतस्थळावर नाव नोंदणी करुन स्पर्धेत भाग घेता येईल. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने आयोजित विविध ऑनलाईन स्पर्धेमध्ये जिल्हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment