जळगाव, (जिमाका वृत्तसेवा)
दि. 29 - नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी
सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते
त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय
लोकशाही दिन येत्या सोमवार, 1 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी यापुर्वी तालुका लोकशाही दिनात
अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावर कोणतेही
उत्तर मिळालेले नसेल अशा वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन सदरहू लोकशाही
दिनी वेळेवर उपस्थित रहावे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस
दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment