Friday, 1 July 2022

तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर येथे अपंग मुला मुलींना प्रवेशासाठी अतिंम मुदत १५ जुलै, २०२२ पर्यंत

    जळगाव, दि.१ (जिमाका वृत्तसेवा) : -  अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ मुंबई मार्फत शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 15 ते 45 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला मुलींना प्रवेश देण्यात येत आहे.

  सदरील प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (सी.सी.ईन.इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्यूटर टायपिंग) वेल्डर कम फॅब्रीकेटर, शिवन व कर्तन कला आणि इलेक्ट्रीशिएन अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. संस्थेत अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकिय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामुल्य सोय केली आहे.

 तरी ईच्छुक अपंग मुला-मुलींच्या, पालकांनी दिनांक 15 जुलै, 2022 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर, रामपूर रोड, देगलूर जि. नांदेड

मोबाईल क्रमांक 9960900369, 9175446411, 7378641136, 9503078767 येथे संपर्क साधावा आथवा प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन प्राचार्य तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर जि. नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        ०००००

No comments:

Post a Comment