जळगाव, दि.18 (जिमाका वृत्तसेवा) : - आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र रावेर जि. जळगांव या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षाकरीता दिनांक 1 ऑगस्ट,2022 ते 15 नोव्हेंबर, 2022 असे एकुण 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते प्रवेशाकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रवेशासाठी अटी :
1)
उमेदवार हा अनुसूचीत जमातीचा असावा.
(जातीचा दाखला आवश्यक) 2) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा 3) उमेदवार हा शालांत
परिक्षा (10 वी) उत्तीर्ण असावा. 4) उमेदवार हा 18 वर्ष पुर्ण असावा.
2)
वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत
बेरोजगार उमेदवारांकडुन विविध शासकीय/निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणा-या
स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी
उमेदवारांना दरमहा रु.1000/- विद्यावेतन देण्यात येते प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता
खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मुळ प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
1) शाळा सोडल्याचा दाखला 2)
10 वी 12 वी गुणपत्रिकेची प्रत 3) आधार कार्ड 4) बैंक पासबूक 5) दोन पासपार्ट साईज
फोटो 6) जातीचा दाखला
अधिक
माहीतीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहिती व
मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ,
रावेर किंवा संपर्कासाठी दुरध्वनी क्र. 02584-251906 या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची
व्यवस्था स्वतः करावी लागेल, असे सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता,
वि जा मुकणे, जळगाव यांनी एक प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलेले आहे..
०००००
No comments:
Post a Comment