जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव या कार्यालयामार्फत गुरुवार दिनांक 14 जुलै, 2022 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 या वेळेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यांत आलेले आहे.
या
मार्गदर्शन सत्रात समुपदेशक दिपक बोरसे,
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जळगांव हे मार्गदर्शन करणार आहेत. या
ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यांत आलेले आहे. गुगल मिट लिंक
खालीलप्रमाणे.
गूगल मिट लिंक -
meet.google.com/sxr-mywu-kgr
तरी
जिल्हातील जास्तीत जास्त युवक/युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment