जळगाव, दि२९ (जिमाका वृत्तसेवा) : - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत ऑगस्ट महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.
ऑगस्ट-2022 चे शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक, दौऱ्याचे ठिकाण
अमळनेर-पहिला व पाचवा सोमवार व तिसरा
शनिवार, जामनेर-दुसरा व चौथा बुधवार, पाचोरा-पहिला व तिसरा बुधवार, भुसावळ-पहिला व
तिसरा गुरुवार, चाळीसगाव-पहिला, तिसरा, चौथा शुक्रवार व दुसरा शनिवार , सावदा – पाचवा
मंगळवार, चोपडा – चौथा सोमवार, रावेर – पहिला
मंगळवार, बोदवड - दुसरा शुक्रवार, पारोळा - दुसरा सोमवार, एरंडोल – चौथा
मंगळवार, मुक्ताईनगर- चौथा गुरुवार,
याप्रमाणे दौरा राहील.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास
आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये म्हटले आहे.
0000
No comments:
Post a Comment