Friday, 1 July 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन

 




            जळगाव, दि.१ (जिमाका वृत्तसेवा) : -  हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री          स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने आज 1 जुलै रोजी जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. अप्पर जिल्हाधिकारी  प्रविण महाजन  यांनी                   स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          याप्रसंगी निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसिलदार सुरेश थोरात, तहसिलदार जितेंद्र कुवर, तहसिलदार कुळ कायदा  महेंद्र माळी, नायब तहसिलदार – अमित  भोईटे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000


No comments:

Post a Comment