जळगाव, दि.18 (जिमाका वृत्तसेवा) : - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये या सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त झाले असतील, अशा उतीर्ण झालेल्या मांतग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विदयार्थी / विदयार्थीनीना महामंडळाकडून जेष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार प्रथम 03 ते 05 विदयार्थ्यांस निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. उपलब्ध निर्धाच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते त्यामुळे दिनांक 25 जुलै 2022 च्या आत संपूर्ण कागदपत्रानिशी मांतग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विदयार्थी / विदयार्थीनींनी जिल्हा कार्यालयात संपर्क करावा, उशिरा आलेल्या अर्जाचा मुख्यालयामार्फत विचार करण्यात येणार नाही.
खालीलप्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीसहित आणावीत.
मार्कशीट
(गुणपत्र), शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, दोन
पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड
सर्टिफिकिटसह व जिल्हा व्यवस्थापकांच्या
नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रासह कार्यालयात संपर्क साधावा. असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन, महाबळ रोड, मायादेवी नगर स्टॉप समोर, हातनुर कॉलनी, जळगाव फोन नं.
0257-2263294 येथेसंपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव ताराचंद कसबे यांनी एका प्रसिध्दीस
दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment