Friday, 1 July 2022

अग्निपथ अग्निवीरवायू म्हणून भारतीय सेनेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता रोजगाराची सुवर्ण संधी

       जळगाव, दि.१ (जिमाका वृत्तसेवा) : - भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीरवायू म्हणून भारतीय सेनेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता जाहिरात प्रसिध्द केली आहे. सदर जाहिरातीमध्ये अग्निवीरवायू पदाच्या परीक्षेकरीता  http;//agnipathvayu.cdac.in  या संकेतस्थळावर अर्ज करता येणार असून अर्ज करण्याचा कालावधी  दिनांक २४ जून, २०२२ ते  ५ जुलै, २०२२ पर्यंतचा आहे.

          भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीरवायू म्हणून भारतीय सेनेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता रोजगाराची संधी मोठया प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगारांना जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.  

०००००

No comments:

Post a Comment