जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 27 - शैक्षणिक तसेच त्रुटीपुर्तते अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 27 आणि 28 सप्टेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या दिवशी सकाळी 10 ते 6 पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर जळगाव या ठिकाणी ज्यांना ऑनलाईन, ई – मेलव्दारे त्रुटी कळविण्यात आली आहे, अशा उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सह सदर दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
तसेच दक्षता पथक व सुनावणीसाठी प्रलंबित
अर्जदारांना स्वतंत्ररीत्या संपर्क साधण्यात येईल. या कालावधीमध्ये आवश्यक ती
पुर्तता करुन घेणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील. या कालावधीमध्ये त्रुट/पुर्तता
आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यास होणाऱ्या नुकसानीस अर्जदार स्वता जबाबदार
राहील, याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन
सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment