जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23- सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत / पूर्ण होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सन 2013 मध्ये आपले सरकार सेवा पोर्टल सुरु केले आहे. सदर पोर्टल अंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विहीत कालमर्यादेत निपटारा होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे.
त्याअनुषंगाने
सर्व सामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या सेवांचा निपटारा विहीत कालमर्यादेत
होण्यासाठी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दिनांक 17 सप्टेंबर, 2022 ते
2 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन
विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडभ्ल पत्र क्र. आरटीएस- 2022 प्र.क्र. 145 / लो. दिक
दिनांक 12 सच्टेंबर, 2022 नुसार कळविले आहे. सदर सेवा पंधरवाडयामध्ये प्रलंबित
फेरफार नोंदीचा निपटारा करण्याबाबतच्या विषयाचाही समावेश करण्यात आला आहे.
महसूल
प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी एक महिन्याच्यावर प्रलंबित फेरफार निकाली
काढण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व मंडळ मुख्यालयी विशेष मोहिम राबवून दिनांक 28
सप्टेंबर, 2022 बुधवार रोजी फेरफारअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. सदर फेरफार
अदालतीचे आयोजन करताना खालील सूचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घेण्यात
यावी.
सर्व
प्रथम तहसील स्तरावर मंडळनिहाय एक महिन्याचे वर प्रलंबित असलेल्या साध्या व
विवादग्रस्त फेरफारांची संख्या (Online MIS प्रणालीचा वापर करुन ) निश्चित करण्यात यावी.
एकही फेरफार नोंद तलाठी लॉगीला डॅशबोर्ड राहणार नाही याची ही दक्षता घ्यावी.
जळगाव
जिल्ह्यातील सर्व मंडळ मुख्यालयी विशेष मोहिम राबवून दिनांक 28 सप्टेंबर, 2022
रोजी बुधवार फेराफार अदालतीचे आयोजन करावे व सदर दिवशी उपविभागीय अधिकारी
कार्यालयातील व तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार / अ.का. यांची प्रत्येक
मंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी.
फेरफार
अदालतीच्या दिवशी प्रलंबित फेरफार नोंदीच्या संदर्भात अर्जदार व हरकतदार यांना
आवश्यक त्या पुराव्यांसह उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजाविण्यात यावी. संबंधित मंडळ अधिकारी यांनी सर्व प्रलंबित
फेरफार उपलब्ध अभिलेखावरुन नियमानुसार असल्याचे निष्पन्न होत असल्यास त्याच दिवशी
प्रमाणित करण्यात यावेत.
सदर
परिपत्रकाची तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तंतोतंत अंमलबजावधी करावी व सेवा
पंधरवाडयाचे यशस्वी आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment