जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23- जळगाव जिल्ह्यातील नागरीकांना कळविण्यात येते की, नविन वाहनाच्या पसंतीचा नोंदणी क्रमांक जारी करण्याच्या शुल्कात वाढ करण्याबाबत संदर्भिय शासनाचे प्रारुप नियमाची अधिसूचना दिनांक 15 सप्टेंबर, 2022 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे.
सदर
अधिसूचनेतील मसूद्याच्या बाबतीत कोणत्याही नागरिकास हरकती किंवा सुचना घ्यावयाच्या
असतील त्यांनी दिनांक 14 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत शासनाचे मा. अपर मुख्य सचिव, गृह
विभाग (परिवहन) महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे अथवा उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी जळगाव यांचेकडे लेखी स्वरुपात सादर करण्यात याव्य असे उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment