जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23- पोलीस अधिक्षक जळगाव यांनी दिनांक 15 सप्टेंबर, 2022 रोजीच्या पत्रान्वये दिनांक 26 सप्टेंबर, 2022 ते 6 आक्टोंबर,2022 या कालावधीत दुर्गादेवी उत्सव-2022 साजरा होणार आहे. त्याचप्रमाणे दिनांक 26 सप्टेंबर, 2002 ते 06 ऑक्टोंबर, 2022 पावेतो चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव या ठिकाणी याच काळामध्ये बालाजी वहनोत्सव व रथोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्वत्र मोठया प्रमाणावर दुर्गादेवी विसर्जन व वहनरथ या मिरवणुका निघणार आहेत. तरी कायदा व व्यवस्थेच्या दृष्टीने जळगाव जिल्हयातील शहरातील व तालुका स्तरावरील आठवडे बाजार नियमित दिवस ऐवजी इतर सोईस्कर दिवशी ठेवणेबाबत विनंती केलेली आहे.
जिल्हादंडाधिकारी
अभिजीत राऊत जळगाव , मुंबई मार्केट ॲण्ड फेअर्स ॲक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क)
अन्वये करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन मी जळगाव शहरातील व तालुकास्तरावरील दिनांक
26 सप्टेंबर, 2022 ते 06ऑक्टोंबर, 2022 रोजी जळगाव शहर व तालुक्यातील इतर
ठिकाणी आठवडे बाजार भरणार असल्यास सदरचा आठवडे बाजार भरणार असल्यास सदरचा बाजार
नियमित दिवस ऐवजी इतर सोईस्कर दिवशी भरविण्यास मंजूरी देत आहे. असे
जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment