Monday, 3 February 2025

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 80 अर्ज प्राप्त

       जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) -  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

            मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या लोकशाही दिनात एकूण 80 अर्ज प्राप्त झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे,  जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांचे अंतर्गत एकूण 32 अर्ज व जिल्हाधिकारी कार्यालयाचे 48 अर्ज असे एकूण 80 अर्ज प्राप्त झाले आहे. या अर्जाचे निराकरण करण्यासाठी सबंधीत विभागाचे अधिकारी उमा ढेकळे, तहसिलदार ( संजय गांधी)  तसेच इतर अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

००००००००००

No comments:

Post a Comment