जळगाव दि. 15 ( जिमाका ) शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असून येणाऱ्या काळात निश्चितच विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी यश संपादन करतील असा आशावाद चाळीसगावचे आमदार श्री मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभाग, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवास शाळा चाळीसगाव येथे आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी वार्षिक
स्नेहसंमेलन वार्षिक पारितोषिक वितरण व इयत्ता दहावी विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम
संपन्न झाला. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून आमदार श्री मंगेश चव्हाण उपस्थित होते.
त्यावेळी ते बोलत होते. सदर कार्यक्रम प्रसंगी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या
विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
आमदार श्री.मंगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे
कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले,तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या
परीक्षेसाठी व त्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी
शुभेच्छा दिल्यात.
यावेळी शाळेतील विविध उपक्रमाचे आमदार चव्हाण यांनी कौतुक करून समाधान व्यक्त
केले. शाळेतील नव्याने स्थापित करण्यात आलेल्या अद्यावत संगणक कक्षाचे उद्घाटनही यावेळी आमदार चव्हाण
यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्राचे
आंचलिक प्रबंधक श्री प्रवीण कुमार सिंह, समाज कल्याण विभाग जळगाव सहाय्यक आयुक्त श्री योगेश
पाटील, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चाळीसगाव श्री विलास भोई, विशेष अधिकारी शासकीय
निवासी शाळा समाज कल्याण विभाग जळगाव श्री
राजेंद्र कांबळे मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली महाजन, गृहपाल श्री लक्ष्मीकांत
कोठावदे हे यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि महाराष्ट्र
गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या
संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती
सोनाली महाजन यांनी केले सूत्रसंचालन श्री दिलीप परदेशी यांनी केले तर श्री महेंद्र
कुमावत यांनी आभार व्यक्त केले . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर
कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
000000000
No comments:
Post a Comment