Friday, 7 February 2025

भडगाव येथे नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी ७ व १०फेब्रुवारीला अर्ज करण्याचे आवाहन

                 जळगाव दि. 7( जिमाका वृत्तसेवा )- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय भडगाव येथे परिवहन्नेत्तर संवर्गातील दोनचाकी टू-व्हीलर वाहनांची नविन नोंदणी एमएच-५४-D-०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

                ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ व १० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजेपर्यंत आपले अर्ज जमा करायचे आहे. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भडगाव यांच्या नावे) तसेच वाहन ज्याच्या नावाने नोंदणी करायची आहे  त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोवाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे.

                     आकर्षक क्रमांकाची पावती प्राप्त झाल्यावर पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करण्याकरिता देणे बंधनकारक आहे. या पावतीची विधीग्राहयता ही फक्त १८० दिवस आहे. तसेच दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ व १० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजेपर्यत अर्ज स्विकारले जाणार आहेत व दि १० फेब्रुवारी २०२५ रोजी अर्जाची छाणणी करण्यात येईल एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा एकच धनाकर्ष DD स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकार राहील.

                दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०५.०० वाजता बंद लिफाफे सहा/उप प्रादेशिक परिवहन अधिकारी याच्या समोर उघडण्यात येतील व जास्त रकमेच धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक बहाल करण्यात येईल उर्वरित अर्जदारास त्यांचे धनादेश परत करण्यात येतील. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रविण बागडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

000000000

No comments:

Post a Comment