जळगाव दि. 10 :- जिल्ह्यातील जळगाव केंद्रावर माहे मे, 2017
मध्ये घेण्यात आलेल्या जी.डी.सी.अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र
परिक्षेचा निकाल घोषित झाला असून सदर परिक्षार्थींना निकालाचे वाटप दि. 11 मे,
2018 ते 25 जुन, 2018 या कालावधीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांचे
कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. तरी ज्या परिक्षार्थींनी माहे मे, 2017 मध्ये
जळगाव केंद्रावर जी.डी.सी.अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र
परिक्षा दिलेली आहे. अशा परिक्षार्थींनी निकालाचे गुणपत्रक, प्रमाणपत्र दि. 25
जुन, 2018 पर्यंत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, प्रशासकीय इमारत, टप्पा क्र. 3, पहिला माळा, आकाशवाणी चौकाजवळ,
जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधून प्राप्त करुन घ्यावे. जे परिक्षार्थी दि. 25
जुन, 2018 पावेतो सदर निकालाचे गुणपत्रक, प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणार नाहीत. अशा
परिक्षार्थींना निकालाचे गुणपत्रक, प्रमाणपत्र दि. 26 जुन, 2018 नंतर पोष्टाद्वारे
पाठविण्यात येईल असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विशाल जाधवर यांनी एका
प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000
No comments:
Post a Comment