जळगाव, दि. 17 - सामाजिक न्याय विभागातर्फे कार्यरत असलेल्या मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात (सिंधी कॉलनी, जळगाव) सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालयीन विभागासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती वसतीगृहाचे गृहपाल यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
विद्यार्थींनींनी वसतीगृहात प्रवेशासाठी प्रचलित जुन्या पध्दतीनुसार लेखी प्रवेश अर्ज भरुन वसतीगृह कार्यालयात जमा करावेत. ज्या वर्गवारीच्या जागा रिक्त आहेत. त्याच वर्गवारीच्या विद्यार्थिनींना वसतीगृह गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल. असेही गृहपाल यांनी कळविले आहे.
०००

No comments:
Post a Comment