जळगाव दि.6- शासनाचे गृहविभाग, मंत्रालय मुंबई यांनी त्यांचेकडील
पत्र क्र. ईएआर 0313/सी-9/ पोल-9 दि. 28 सप्टेंबर 2018 च्या अधिसूचनेव्दारे शस्त्र
नियम,2016 मधील नियम 15 मध्ये सुधारणा करण्यात आलेली असून दि. 31 मार्च 2016 पर्यतच्या
शस्त्र धारकांना UIN क्रमांक प्राप्त करुन
घेण्याची मुदत दि. 31 मार्च, 2019 पर्यत वाढविण्यात आलेली आहे.
शस्त्र नियम 2016 मधील नियम 15, उप नियम (2) नुसार प्रत्येक परवाना प्राधिकारी व
नुतनीकरण प्राधिकारी हे शस्त्र परवानाधारकांची माहिती NDAL-ALIS प्रणालीत भरुन त्यांना UIN क्रमांक प्राप्त
करुन देतील त्याप्रमाणे जर शस्त्र परवानाधारकाने दि. 31 मार्च, 2019 पर्यत UIN
क्रमांक प्राप्त करुन घेतला नाही तर त्यांच्या शस्त्र परवाना दि. 1 एप्रिल 2019
नंतर अवैध समजण्यात येईल अशी तरतुद भारत सरकारने त्यांच्या दि. 12 जुलै 2018 च्या अधिसूचनेमध्ये केली
आहे.
दिनांक 31 मार्च 2016
पर्यतच्या शस्त्र धारकांना UIN क्रमांक प्राप्त करुन घेण्याची मुदत दि. 31 मार्च
2019 पर्यत वाढविण्यात आलेली आहे. तसेच दि. 31 मार्च 2018 नंतर UIN क्र. नसलेले
सर्व शस्त्र परवाने रद्द होतील व सदर शस्त्र परवान्यावर नोंद असलेली शस्त्र
बेकायदा समजून सरकार जमा केली जातील यांची सर्व शस्त्र परवाना धारकांनी नोंद
घ्यावी, तसेच यासंदर्भात संबंधित पोलीस अधिक्षक जळगाव, उपविभागीय दंडाधिकारी
(सर्व) यांना देखील स्वतंत्र पत्र देवून संबंधितांना कळविण्यासंदर्भात या
कार्यालयामार्फत कळविण्यात आलेले आहे. असे जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment